त्या गिटारने वेड लावलंय. जितक्या वेळा ऐकतो तितकंच मी त्या संगीताच्या जास्त प्रेमात पडतो. गिटार,Bass गिटार,तबला, ड्रम्स,कधीकधी बासरी आणि संपूर्णपणे भारतीय लोकजीवन किंवा Philosophy वर आधरित पण अतिशय वेगळी अशी ती गाणी आणि या सर्वांतून तयार झालेलं ते संगीत फार वेगळं आहे. इंडियन ओशन (Indian Ocean)या इंडियन बॅन्ड (Band) बद्दल बोलतोय मी.
१९९० पासून अस्तित्वात असलेल्या इंडियन ओशन या band ची मला साधारण २ वर्षांपूर्वी ओळख झाली. इतकी वर्षं मला या प्रकाराची काहीच माहिती कशी नव्हती याचं मला आजही खूप आश्चर्य वाटतं.
प्रसिद्धीमाध्यमांत गाजावाजा करुन आपलं संगीत लोकांच्या गळी उतरवणाऱ्या लोकांपैकी इंडियन ओशन नक्कीच नाहीत. यातच त्यांचं वेगळेपण आहे.
अशीम चक्रवर्ती (तबला,Vocals),सुस्मित सेन(गिटार),राहूल राम(Bass गिटार,Vocals),अमित किलाम(ड्रम्स) ही Band ची ४ लोकं. इंडियन ओशनचा संगीतप्रकार खूप वेगळा आहे. Indian Classical, Rock, Sufi Philosophy यांचं Fusion म्हणता येईल पण ते खरोखरीच फार भारी Fusion आहे.
इंडियन ओशन हा प्रकार इतकं वेड का लावतो?
१.Originality - या संगीतावर कोणाचीही छाप नाहीये. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असं काही यापूर्वी ऐकल्याचं मला जाणवलं नाही. सगळीच Compositions सुंदर आहेत आणि सुस्मित सेन च्या गिटारला तोड नाहीये.
२. Vocals- राहूल राम चा तो वेगळा आवाज Band चा Trademark आहे.
३.गाणी आणि त्यातले शब्द.
इंडियन ओशन खऱ्या अर्थाने इंडियन आहे.
'देस मेरा' या गाण्याच्या ह्या काही ओळी.
देस मेरा रंगरेज़ ये बाबू
घाट−घाट यहाँ घटता जादू
धूल गुबाऱ में जंतर मंतर
बाहर से भोला गहरा अंदर
इंडिया सर ये चीज़ धुरंधर
जेब दलिंद्दर दिल है समंदर
गाणी खरंच अर्थपूर्ण आहेत. 'नम् म्यो हो' हे गाणं तर सिद्धार्थच्या (नंतरचा गौतम बुद्ध) घरदार सोडून जाण्यापूर्वीच्या
मनःस्थितीवर आहे.
भोर हे माझं सर्वांत आवडतं गाणं. गाण्याचे शब्द फार सुंदर आहेत. कितीही वेळा ऐका हे गाणं अजूनच छान वाटतं.
Melancholic Ecstasy, Torrent (Instrumental) गाण्यांच्या बाबतीतही हेच . अर्थात सगळीच गाणी छान आहेत. काही गाण्यांतील न समजणाऱ्या हिंदी शब्दांचे अर्थ मी माझ्याकडच्या हिंदी Dictionary मधून शोधून काढले.( हिंदी गाण्यांतील शब्दांचे अर्थ कळत नाहीत म्हणून मी पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील दुकानं पालथी घालून एक हिंदी Dictionary आणलीये. वर्षानुवर्षं हिंदी गाण्यांतील यमक जुळवण्याची धुरा अविरतपणे सांभाळणाऱ्या इकरार,ऐतबार,दीदार वगैरे शब्दांचे अर्थं मला याच Dictionary मधून कळालेत. :-) असो.)
Village Damsel या बंगाली गाण्याचा अर्थ काही केल्या लागत नव्हता. मग Orkut वर बंगाली Community मधे मी मदत मागितली आणि एका बंगाली बांधवाने मला मदत केली. Orkut या माध्यमाचा पहिल्यांदाच एवढा चांगला उपयोग केल्यामुळे मी स्वतःवरच एकदम खूष झालो.काही संस्कृत श्लोकांचे अर्थं लावण्यासाठी आशुतोषची (ऑफिसमधला मित्र) मदत घेतली.
काही राजस्थानी आणि काही संस्कृत शब्दांचे अर्थ लागायचे आहेत अजून पण ते लवकरच होईल अशी आशा आहे.
Instrumental Music बद्दल अधिकारवाणीने बोलावं इतकं मला त्यातलं नक्कीच कळत नाही. पण ही एक सुरुवात आहे. आणि त्यातलं ज्यांना कळतं अशी लोकं आजूबाजूला नक्कीच आहेत. (कुवळ्या,चारु,आशुतोष तुमच्याबद्दल बोलतोय मी :-) ) त्यांच्या आधाराने थोडंफार शिकायला मलाही आवडेल.
इंडियन ओशनच्या संगीताची लोकांना ओळख व्हावी वगैरे व्यापक आणि उदात्त दृष्टिकोनातून मी हे लिहिलेलं नाहीये (तस झालं तर आनंदच आहे) पण मला हे लिहिणं भाग होतं. ज्या संगीताने आत्तापर्यंत इतका आनंद दिलाय त्याचं मी खरोखरच देणं लागतो. ते थोडसं कमी करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
Saturday, May 13, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
छान समीक्षा आहे! एकच टीप, अशा प्रकारचे fusion करणारा Indean ocean पहिलाच नव्हे! turning point चे शीर्षक संगीत आठवते? ते बरेचसे villege damsel सारखे आहे. आनंद शंकर आणि अजय पोहनकरही या fusion चे इतर संस्थापक आहेत. या details मध्ये चूक असू शकते.
मस्तच रे!
आणि तू ऊर्दू डिक्शनरी आणलीयस का? श्रीपाद जोशी नामक माणसाने एक भारी ऊर्दू-मराठी शब्दकोश लिहिलाय.
आणि ही नेट वर एक महान डिक्शनरी आहे बघ:
http://urdudict0.tripod.com/
कौस्तुभ, दोन-तीन लोकांनी खो दिलाय, आता तरी ये रे 'पुस्तकनिष्ठांच्या मांदियाळी'त.
Post a Comment