Wednesday, January 17, 2007

गुरू - आणखी एक परीक्षण

प्रिय मित्र योगेश,
तुझे गुरुबद्दलचे (हास्यास्पद) परीक्षण वाचले. म्हटलं तुला पत्राद्वारेच उत्तर द्यावे.

पहिली गोष्ट. तू म्हणतोस की, गुरूभाई म्हणजे धीरुभाई नव्हेत. तर विकिपेडीया वरील हा संपूर्ण लेख वाच.
http://en.wikipedia.org/wiki/Dhirubhai_Ambani

आता तू आरोप करशील, की खास मणीरत्नम साहेबांनी स्वत: हा लेख 'गुरू'ची पब्लिसिटी करायला लिहिलाय. पण दुर्दैवाने ते खरं नाहीये. तू म्हणशील, की धीरुभाईंचं आयुष्यच हास्यास्पद आहे पण आमच्यासाठी ते एक वास्तव आहे. आजही धीरुभाईंना खांद्यावर पंचे घेऊन विकताना पाहिल्याचं लोक मुंबईमधे शपथेवर सांगतात. पुढे याच माणसाने रिलायन्स स्थापन केली. रिलायन्सच्या शेयरहोल्डरर्सच्या मीटिंग्ज खरोखरीच मोकळ्या मैदानात किंवा स्टेडियम मधे होत. असो.

तू म्हणतोस, की अभिषेक-मिथुनदा सोडले तर पिक्चरमधे पाहण्यासारखं काहीच नाही. पण आम्ही बापुडे पिच्करमधे अभिनय पाहण्यासच जातो. तुझ्या न्यायाने थोरल्या बच्चनसाहेबांच्या जुन्या पिक्चर्समधे पाहण्यासारखं काही होतं का?
हिंदी पिक्चर्स असे कितीसे तर्काला धरून बनवले जातात? थोड्याफार गोष्टी इकडेतिकडे व्ह्यायच्याच. भारतातल्या लाखो लोकांना अपील करायचं म्हणजे थोडंफार तर्काला बाजूला ठेवावच लागतं. नाही का? आता अगदीच अतार्किक पिक्चर बनवण्याऱ्या करण जोहरला आपण मनसोक्त शिव्या घालतोच. पण मणीरत्नमबद्दल बोलताना तुझ्या-माझ्यासारख्या समंजस लोकांनी थोडसं जपून बोललं पाहिजे. नाही का?


गुरू नक्की काय करतो ज्यामुळे तो एवढा मोठा होतो, हे मणिरत्नम दाखवतच नाही हे तुझं म्हणणं खरं आहे. पण मणिरत्नमला ते दाखवायचंच नसावं. पिच्करमधे काय पाहायचं ते ऐक.

गुरू ज्या धडाकेबाजपणे सुजाताला मागणी घालतो ना, ते पाहायचं. मेव्हण्याचा आधी उपयोग करून वेळीच त्याला त्याची जागा कशी दाखवून देतो ते पाहायचं. आपली कामं करून घेण्यासाठी लोकांना खूष करायचं गुरूला बरोब्बर कसं जमतं ते पाहायचं. खूप जवळच्या नात्यांत सुध्दा केवळ व्यवसायामुळे कशी वितुष्ट येतात ते पाहायचं आणि ती आली तरी परस्परांबद्दलचा आदर लोकं कशी जपतात ते पाहायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या नवऱ्याची पहिली priority त्याची महत्त्वाकांक्षा आहे, तो चालू आहे, नवऱा धंद्यात गफले करतोय हे माहीत असूनही सुजाता त्याच्यामागे शेवटपर्यंत कशी उभी राहते ते पाहायचं. माझ्या दृष्टीने या गोष्टी वास्तवाच्या खूप जवळ आहेत.

असो. मी पत्र खेळीमेळीत लिहिलंय. मनावर घेऊ नकोस. बाकी काही होऊ दे, आपल्या (वि)संवादाने पब्लिक गुरू पाहणारच. बघ.

तुझाच मित्र,
कौस्तुभ.

4 comments:

प्रिया said...

अरेच्चा! आता पहावाच लागणार 'गुरू'... :)

yogesh said...

आमचा प्रतिसाद येथे वाचा.
तू खेळकरपणेच घेशील हा विश्वास आहे.

भिकू म्हात्रे said...

कौस्तुभ, माझे कमेंट्स तुझ्या ह्या blog वर नाहीएत. मला एक सांगावसं वाटतं की तू तुझ्या blog चं टेम्प्लेट बदल. काळ्या background वर पांढरी अक्शरं डोळ्यांना सहन होत नाहीत रे. एक वाचुन झाल्यावर मी पुढे वाचायचं बंद केलं. :)

Kaustubh said...

भिकू भाय,

कुछ अच्छा पढनेके लिये थोडा टेन्शन लेनाच पडेंगा. :)
वैसेभी ये टेम्प्लेट एकदम फेमस रेहनेका. और अप्पुनको पसंद आता है ये. तो बात खतम.
लेकिन अगर बाकी लोगोको भी ऐसाच लगता है तो अप्पुन तेरे सजेशनपे गौर करेंगा.