Sunday, February 25, 2007

अशक्य विशेषणकोश

"मी बेक्कार अभ्यास केला होता रे, पण वाईट निकाल लागलाय."

अशाप्रकारची वाक्ये ऐकून काही लोकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. बेक्कार अभ्यास केल्यावर वाईटच निकाल लागणार असे वाटू शकते. पण मला समवयस्क असणाऱ्यांचा असा गोंधळ होणार नाही. 'बेक्कार' या शब्दाचा अर्थ आम्ही 'खूप जास्त' असा घेतो. "आज तू खूप गरीब दिसतो आहेस", यात समोरची व्यक्ती अचानक गरीब झालेली नसून आजच्या वेशात ती फारशी बरी दिसत नाहीये असा अर्थबोध होतो. आमच्या रोजच्या भाषेत अशी विशेषणे मजबूत आहेत. (मजबूत म्हणजे खूप, अनेक)

आता एखादा मास्तर सही शिकवतो म्हणजे तो चांगला शिकवतो एवढाच अर्थ होतो. पण एखादा मास्तर कडक शिकवतो म्हणजे तो चांगला शिकवतोच पण त्याच्या शिकवण्यात एकप्रकारचे Attitude दिसून येते, असा अर्थ होतो. मास्तर electronics चा बाप आहे म्हणजे तो लै भारी आहे. थोडक्यात सही, कडक आणि बाप हे चांगला या विशेषणाला समानार्थी शब्द असले तरी त्यातदेखील असे लहान पण महत्त्वपूर्ण फरक आहेत.

मी सहज म्हणून विचार केला, आपण वापरत असलेली अशी विशेषणे तरी किती आहेत. या विशेषणांचा मूळ मराठीतला अर्थ वेगळाच आहे पण आपण ती अशी सर्रास वेगळ्याच अर्थाने वापरतो किंवा अर्थ जवळपास सारखाच असला तरी त्यांचा वापर आपण वेगळ्याच प्रकारे करतो. बऱ्याचदा नामांचीच विशेषणे केली जातात. काही शब्द हिंदी-इंग्रजीतून आलेले आहेत. काही शब्द खास नव्याने तयार करण्यात आलेले आहेत. एक मोठ्ठीच्या मोठ्ठी यादी तयार झाली. ही सर्व विशेषणे आमच्या तोंडात इतकी बसलीयेत, की इखाद्या गोष्टीचे उत्कटतेने वर्णन करताना बरोब्बर हेच शब्द आठवतात. ही सर्व विशेषणे अर्थासकट आणि त्यांच्या योग्य वापरासह अशक्य विशेषणकोशातून वाचकांसाठी खुली करण्याचे कार्य येथे करत आहे. (अशक्य म्हणजे खूप भारी.) यातील अनेक विशेषणांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर पुण्यातील अभियांत्रिकी वर्तुळात केला जातो. मी स्वत: अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यातून घेतल्याने या विशेषणकोशावर साहजिकच तेथील भाषेचा प्रभाव आहे.
विशेषणकोशाचे स्वरूप समानार्थी शब्दांचा संच, त्यांचा मूळ मराठीतील अर्थ आणि उदाहरण या स्वरुपात आहे.
-------------------------------------------------------------
अशक्य, तुफान, महान, उच्च, बाप, खतरनाक - खूप चांगला, उत्तम, सरस.
अमिताभने शोलेत अशक्य काम केलंय.
नोकिया ६६१० तुफान आहे.


बेक्कार, बेदम, मजबूत, भक्कम, अमाप, अफाट, मेजर - खूप जास्त, संख्येने अधिक.
संतोषने संख्याशास्त्रावरील बेक्कार पुस्तकं गोळा केली.
आज मी भक्कम जेवलो आहे.



वेड, कमाल, सही, अस्सल, कल्ला, जबरी, खल्लास, धुव्वा, दंगा - चांगला, छान.
भय्याच्या टपरीवर कमाल चहा मिळतो.
आम्ही वर्गात आज वेड टाईमपास केला.
विनोद दंगा गिटार वाजवतो.


गरीब - चांगला नसलेला, हलक्या दर्जाचा, कमी प्रतीचा, सुमार.
प्रियांका चोप्राचा अभिनय तिच्या सौंदर्याइतकाच गरीब आहे.


छपरी, डबा, दया - वाईट,
पुण्यातील रस्ते छपरी आहेत.

भीषण - फार वाईट
कुछ कुछ होता है हा अतिशय भीषण चित्रपट आहे.

सामान, माल, टप्पा, डाव, रापचिक, पार्टी - सुंदर, रुपवान, लावण्यवती.
आज बसमधे मला एक सामान पोरगी दिसली.

यो - विचित्र, हास्यास्पद, पाश्चात्त्यांचे अनुकरण करताना फसलेला.
एकाच कानात डूल घालून फिरणारा दत्तू यो दिसतो.

विशेष - इतरांपेक्षा वेगळी, उठून दिसणारी.
लाल ड्रेसमधे आज ती विशेष दिसत होती.

कडक - चांगली पण स्वत:ची ऐट, दिमाख (Attitude) असणारी गोष्ट.
CBZ ही कडक बाईक आहे.

रामपाट - आडवातिडवा, जोरदार.
धोनीने आज रामपाट बॅटींग केली.

घष्टन - घनिष्ट, जवळचा.
दत्तू आणि शंकर हे लहानपणापासूनचे घष्टन मित्र आहेत.

रावडी - गावठी, ताळेबंद सोडून.
मिरवणूकीत आम्ही रावडी नाचलो.

झटॅक, झटांग, ढिनचॅक - भडक.
केशरी रंगाची झटॅक पॅन्ट घालून फिरणारा एक इसम आज मी पाहिला.

गन्या, छगन - बावळट, मूर्ख, कमी बुद्धीचा.
तुषार कपूर अगदीच गन्या वाटतो.

आरबिट - कसेही, कोणतेही, सहजपणे उचललेला, मूळ इंग्रजी शब्द Arbitrary चे संक्षिप्त रूप.
नेतेमंडळी आरबिट भाषणे देत फिरत असतात.

-------------------------------------------------------------------------------
हा विशेषणकोश खुला आहे. यात भर घालण्याचे काम सुरू आहे.

17 comments:

Milind said...

घष्टन - चड्डी, जानी

उदा. हिलरी आणि ओबामा सध्या शत्रू आहेत, पण डेमॉक्रॅटिक प्रायमरी झाल्यावर बघ, कसे चड्डी होतात ते.

स्तुत्य उपक्रम.

- मिलिंद

yogesh said...

प्रियांका चोप्राचा अभिनय तिच्या सौंदर्याइतकाच गरीब आहे.
:o हे काय भलतेच? प्रियांका चोप्रा रापचिक आहे. :))

अजून 'वडील' हा एक शब्द ऍड कर... त्याचा अर्थ बाप प्रमाणेच..

सचिन तेंडूलकर वडील खेळला ;)

प्रिया said...

माझी फू.न.फू.पा. :)


खडकी-दापोडी : हलक्या प्रतीचे
फणस लावणे: फालतू शंका काढणे
बुंगाट: जोरात
पेटणे: चिडणे, रागावणे
डोळस/बॅटरी: चश्मा असलेला/असलेली


सध्या एवढंच आठवतंय! :) BTW, खरंच स्तुत्य उपक्रम! :p

Gayatri said...

:) बुंगाट!!

बळंच - उगाचच, ओढूनताणून
पडीक - एखाद्या जागेचा 'उदार आश्रयदाता':D
फोडणे - 'उच्च' कामगिरी करणे

yogesh said...

सारेगमप महागायक स्पर्धेने दिलेला एक शब्द ->
"तोडलंस"

हा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण म्हणून वापरता येईल.

एक उदाहरण
"मित्रा तू तोडलंस"
:p

Kaustubh said...

मिलिंद,
चड्डी हे विशेषण उदाहरणासकट आवडले. :D

योगेश,
वडिलांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रिया,गायत्री

बुंगाट, खडकी-दापोडी, डोळस, पडीक, बळंच बद्दल धन्यवाद.
फणस लावणे, पेटणे, फोडणे हे शब्द कियापद किंवा वाकप्रचार यात मोडतात. लवकरच यांसाठी नवीन कोश तयार करण्याचा विचार आहे. :)

ही नवीन विशेषणे लवकरच कोशात उदाहरणांसकट समाविष्ट केली जातील.

Tulip. said...

lol.. eka se ek sahi ahet visheshane ani kriyapade. hya babtit mi farach 'out of touch' agadi 'magasaleli' ahe. lage raho kaustubh.. dnyanat bhar padatey majhya:))

अनु said...

barech shabd mahit hote, kahi navin kalale.

Bhagyashree said...

हेहे.. फारच छान आहे विशेषणकोश! अजून माहीती साठी http://www.maayboli.com/hitguj/messages/644/121512.html?1172380345
इथे बघ...

Monsieur K said...

बुंगाट!!
"class" आहे हे!
engg che divas aathavle!
lai bhaari! :)

Dhananjay said...

Kahi shabda Mazyakadun.. Minglish baddal sorry :)

Aurangzeb - kahihi ras naslela
e.g. To ganyatala Aurangzeb ahe

Chiman - equivalent for Chagan, Ganya

Gandlela

TheKing said...

hey man, how could u forget POPAT?

And I assume it need not be explained :-)

yogesh said...

अरे आता एक आठवला
'चाबूक'

प्रियांका चोप्रा कसली 'चाबूक' दिसते

HAREKRISHNAJI said...

सही

Abhi nahi to kabhi nahi said...

Xtremly well written.....manje khoopach ashakya lihilay......

rahul said...

खूप चांगला ब्लॉग आहे तुम्च....सुपेर्ब,तुमाला आजुन ल्हीवायला पहिजे...तुम्हि ही साइट पहा www.quillpad.in/marathi ही तुमाला फार मदाद गार रहिल...वप्रुन पहा

Prasad Chaphekar said...

ajun kahi

YZ :- chamatkarik, wikshipt.
ha kasla shortform aahe he sangayla pahije ka? :)
eg. to kasla YZ master aahe are!!

zimaat :- bungaaT

TinpaaT, Tumper = ati bhangar

aaNi nusta ganya nahi,
"anya,ganya,papya" hi teenhi wisheshana ekdam dyaaychi astaat!

YamYan (M,N) = ashudhdha uchchaar karNara (usually a prof)