हे क्षण असेच असतात. समोर घडत असलेलं आपण सुन्न होऊन पहात असतो. दुसऱ्या कशातही लक्ष नसतं. उत्सुकता असतेच पण त्याचबरोबर अस्वस्थताही. फेडररच जिंकावा असं कितीही वाटत असलं, तरी Grass वरही नदाल आता वरचढ ठरतोय हे दिसत असतं. अचानक मॅच फेडररच्या बाजूला झुकते आणि तो जिंकतो. त्या वेळी नक्की काय वाटतं हे सांगताही येत नाही.
२००५ च्या Australian Open ची फेडरर-साफिन सेमि-फायनल आठवते. आधीच्याच मॅच मधे फेडररने अगासीला हरवल्याने माझा त्याच्यावर थोडासा रागच असतो. पण या वेळी फेडररच्या खेळाने वेड लागतं. फेडरर हरतो, पण त्यानं आपल्याला जिंकलं असतं. त्या दिवशी फेडरर आणि GOD हे शब्द माझ्यासाठी समानार्थी होतात. आता तसंच नदालच्या बाबतीतही होतं.
एक एक क्षण आठवू लागतात. ९९ च्या क्रिकेट वर्ल्डकपची ऑस्ट्रेलिया- साऊथ आफ्रिका सेमी फायनल. एका ओवर मधे आफ्रिकेला ९ रन्स हवेत. ९ विकेट गेल्यात. क्लूजनर दोन खणखणीत चौकार हाणतो. जिंकायला आता फक्त एक रन. पण तो शेवटचा रन-आऊट. मॅचनंतर पुढचे कितीतरी दिवस मला क्लूजनरला प्रत्यक्ष भेटून सांगावसं वाटतं , "बाबा रे, छान खेळलास, डोळ्यातनं पाणी काढलंस आमच्या."
२००२ ची नॅटवेस्ट फायनल. शेवटच्या १०-१२ ओवेर्स मित्राकडे पाहू असं ठरवून औंधला निघालो असताना वाटेत सेनापती बापट रोडवर आमची गाडी पंक्चर होते. काय पण वेळ. गाडी तिथेच लावून रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमधे घुसून मी कुठे TV दिसतोय का ते पाहतो. एका पेशन्टच्या रूम मधे मला TV दिसतो. ओळख ना पाळख. जागेचं भान नाही. मी त्या पेशन्टच्या रूममधे शिरून उरलेली मॅच पाहतो.
क्रिकेटचं वेड पुढे खूपच कमी झालं तरी हे क्षण विसरणं कसं शक्य आहे?
२००५ च्या Formula 1 European Grand Prix चे काही शेवटचे क्षण. मॅक्लरेन चा किमी रॅकिनन सर्वात पुढे आहे पण त्याच्या गाडीच्या टायर Suspension ला प्रोब्लेम आहे. त्या टायरचे Vibrations पाहून पोटात गोळा येतोय. शेवटचा लॅप चालू होतो. फक्त एक लॅप. काही क्षणांचाच प्रश्न. पण Suspension फेल होतं आणि गाडीचं चाक निखळतं. किमीची गाडी गोल फिरत Race Track च्या बाहेर जाते. पुढचे २ दिवस मला अन्न गोड लागत नाही.
फुटबॉल वर्ल्ड कप फायनल. फ्रान्स-इटली १-१ बरोबरीत. Extra Time मधे झिदान अफलातून हेडर मारतो. बफन तेवढाच अफलातूनपणे तो वाचवतो. क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो.
आयुष्याचा गाडा खडखडात करत रटाळपणे पुढे जातोय असं वाटत असतानाच हे क्षण येतात आणि तोच गाडा जोमाने ओढण्याची उर्मी देऊन जातात..पुन्हा एकदा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
आयुष्याचा गाडा खडखडात करत रटाळपणे पुढे जातोय असं वाटत असतानाच हे क्षण येतात आणि तोच गाडा जोमाने ओढण्याची उर्मी देऊन जातात..पुन्हा एकदा.
सुंदर वाक्य... अगदी मनातलं बोललास...अशीच एक मॅच म्हणजे बेंगलोरला झालेली भारत-पाकिस्तान वर्ल्डकपची. :)
ज्यांना नाविन्याचं आकर्षण आहे ते खेळांच्या प्रेमात पडलेले असतात. खेळांमध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही घडत असतं. आणि तुम्ही सांगितलेले सगळे क्षण म्हणजे सर्वोत्तमच. अगदी ऋषीकेश कानिटकरने मारलेला चौकार असो किंवा ब्रेट ली ने द्रविडचा फोडलेला कान असो. भावनांचा कल्लोळ असतो नुसता.
:) शेवटच्या वाक्याचं कौतुक वाटलं! खरंच, रोजच्या रटाळ आयुष्यात हे असे dynamic खेळ मझा आणतात!
Lekh aavadla. Khaskaroon shevaTacha vaaky! Shivaay punhaa lihitaa zaalaas he paahoon bara vaaTala.
भाहूत अच्छा जानकारी कीय आ आपने
आप के ब्लॉग पुस्तक से भी भाहूत अच्छा हे
क्या आप ए सब हिंदी मे लिखने के लिए quillpad.in/hindi उपयोग किया
evdha sagLe kheL follow kara nahi me, paN bhavana bhiDlya!!
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/
Post a Comment