स्वत:मधेच इतका गुरफटत कसा गेलो हे कळलंच नाही. माझ्या रूममधल्या बेडवर आडवं पडून वरच्या छताकडे पहात काळज्या करत बसायच्या हा माझा आवडता छंद झाला होता. अभ्यासाच्या काळज्या, M.tech झाल्यावर पुढे काय याच्या काळज्या किंवा या वयात साधारणत: ज्या काळज्या आपोआप मागे लागतात त्या काळज्या. नंतर लक्षात आलं, की या प्रश्नांना उत्तरं अशी नाहीचेत. वैतागून मी ठरवलं की आता आपण वैश्विक चिंता करायच्या. थेट विश्वाच्या चिंता. पुढचे काही दिवस मी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर चिंता करायचं ठरवलंय.
एकंदरीत मूड थट्टेचा दिसतोय असं तुम्हाला वाटलं असेल. पण तसं नाहीये.
मध्यंतरी एक मित्र मला म्हणाला, "ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण मरणार रे." मला कळेचना, याला त्याची एवढी का काळजी म्हणून. पेपरातही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही दिसलं की मी हटकून वाचायचं टाळायचो.
अगदी नुकतंच अल् गोर आणि IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल बद्दल ऐकलं आणि मी या विषयात लक्षं घालायचं ठरवलं. इतके दिवस अंटार्क्टिका खंडातील बर्फ वितळतोय वगैरे गप्पांशी मला काही फारसं देणं-घेणं नव्हतं. पण सहज म्हणून इंटरनेट वर फिरताना अंटार्क्टिकाचे हे फोटो पाहिले आणि मी भारावून गेलो.
त्यानंतर अल् गोर यांचा An Inconvenient Truth हा माहितीपट पाहिला आणि या सगळ्या गोष्टीचं महत्त्व लक्षात यायला लागलं. अल् गोर हा माणूस अमेरिकन असूनही तसा प्रामाणिक वाटतो. :) अगदी आवर्जून पहावा असा हा माहितीपट आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी विकिपीडिया वर लिहावं असं मनात होतं. यानिमित्ताने ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढीबद्दल मी थोडसं लिहिलंय. विकिपीडिया या गोष्टीचं मला कमालीचं आकर्षण आहे. ही गोष्ट खरोखरंच फार मोठी आहे. विकिपीडियावर लिहिण्याच्या निमित्ताने हा प्रकल्प नक्की चालतो कसा, हे कळलं. एक चांगली सुरूवात झाली एवढं नक्की.
आनंदाची गोष्ट म्हणजे या वेळच्या Techfest मधे IPCCचे अध्यक्ष डॉं. राजेंद्र पचौरी आणि विकिपेडियाचे निर्माते जिमी वेल्स यांची लेक्चर्स आहेत. ती आवर्जून ऐकण्याची इच्छा आहे.
सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक चिंता करता करता माझा वेळ खूप चांगला जातोय. एक माणूस म्हणून आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे. स्वत:च्याच काळज्या गोंजारत बसलं की नेमका याच गोष्टीचा विसर पडतो, हे आमचे दुर्दैव.
Wednesday, January 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
Good! Ya global chinteche falit blog var yeu dya mhanje zala!
Hey Koustubh...I really appreciate ur all blogs and all articles..A good writer making in progress..keep writing...
der aaye durust aaye...
good write! expecting more detailed one after listening the lectures
अभिनंदन! प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल. "पर्यावरणाबद्दल आस्था असलेले मराठी ब्लॉगर" या दुर्मिळ प्राण्यांच्या जातीमधे आपले स्वागत. पुढील कार्य व त्यासंबंधीचे लिखाण लवकरच वाचायला मिळेल ही अपेक्षा.
गेल्या वर्षात माझ्या ब्लॉगवर पर्यावरणावर अनेक लेख प्रशिद्ध आहेत. ते इथे वाचा:
http://kasakaay.blogspot.com/search/label/Environment
कौस्तुभ,
हा तुमचा ब्लॉग आहे. (आत्ता ट्युब पेटली).
बरेच दिवस तुम्ही गायब होतात म्हणुन विसरायला झालं
छान रे. रामचंद्र गुहा वगैरेंची या विषयावरची पुस्तके अवश्य वाच. तुला एक आगाऊ सल्ला म्हणजे जनांसी अनुभव पुसता(!) या मराठी पुस्तकाला स. ह. देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाच.
Post a Comment